13 जूलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या तीन बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स १५ जुलै २०११ रोजी १८५६१ वर बंद झाला. त्याअगोदरच्या आठवडयात सेन्सेक्स १८८५८ वर बंद झाला होता म्हणजेच या आठवडयात सेन्सेक्सने २९७ अंशाची साप्ताहिक घसरण नोंदवली.
सेन्सेक्सला १८७२६ वर पाठबळ उपलब्ध आहे असे वाटत असताना निरंतर विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स १८७०० च्या खाली घसरला आहे. त्यामुळे आगामी आठवडा देखील नरमाईचा असेल. घसरणीचे सत्र असेच चालू राहिले तर सेन्सेक्स १८४०० पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. एखादया दिवशी तेजी दिसली तरी ती नाममात्र असेल. अशा दोलायमान अवस्थेत गुंतवणुकदारांनी शेअरबाजापासून दूर राहिलेले बरे.
या अगोदर सूचविलेल्या समभागांपैकी आरइसी, पॉवर फायनान्स, येस बॅंक यांनी लक्ष्य प्राप्ती केली आहे. सदर गुंतवणुकीतुन फायदा झाल्यास नफा वसुली करावी हे उत्तम .
- प्रविण निकम
Email : askmeta@rediffmail.com
No comments:
Post a Comment