marathi blogs widget

Sunday, July 17, 2011

दोलायमानता

13 जूलै २०११ रोजी मुंबईत झालेल्‍या तीन बॉम्‍बस्‍फोटांच्‍या पार्श्‍वभूमीवर सेन्‍सेक्‍स १५ जुलै २०११ रोजी १८५६१ वर बंद झाला. त्‍याअगोदरच्‍या आठवडयात सेन्‍सेक्‍स १८८५८ वर बंद झाला होता म्‍हणजेच या आठवडयात सेन्‍सेक्‍सने २९७ अंशाची साप्‍ताहिक घसरण नोंदवली.

सेन्‍सेक्‍सला १८७२६ वर पाठबळ उपलब्‍ध आहे असे वाटत असताना निरंतर विक्रीच्‍या दबावामुळे सेन्‍सेक्‍स १८७०० च्‍या खाली घसरला आहे. त्‍यामुळे आगामी आठवडा देखील नरमाईचा असेल. घसरणीचे सत्र असेच चालू राहिले तर सेन्‍सेक्‍स १८४०० पर्यंत घसरण्‍याची शक्‍यता आहे. एखादया दिवशी तेजी दिसली तरी ती नाममात्र असेल. अशा दोलायमान अवस्‍थेत गुंतवणुकदारांनी शेअरबाजापासून दूर राहिलेले बरे.

या अगोदर सूचविलेल्‍या समभागांपैकी आरइसी, पॉवर फायनान्‍स, येस बॅंक यांनी लक्ष्‍य प्राप्‍ती केली आहे. सदर गुंतवणुकीतुन फायदा झाल्‍यास नफा वसुली करावी हे उत्‍तम .

- प्रविण निकम

Email : askmeta@rediffmail.com

Thursday, July 14, 2011

तेजीचा गतिरोधक

4 जुलै 2011 रोजी सुरु झालेल्‍या सव्‍ताहात सेन्‍सेक्‍स १८८९६ वर उघडला. आठवडयातील सेन्‍सेक्‍सची किमान पातळी १८८६२ होती तर साप्‍ताहिक कमाल पातळी १९०९७ होती. शुक्रवार, 8 जुलै रोजी सेन्‍सेक्‍स १८८५८ वर बंद झाला. या सप्‍ताहात सेन्‍सेक्‍सने १९००० चा टप्‍पा पार केला तरी नफा वसुलीमुळे सप्‍ताहाचा शेवट निराशेत झाला. मागील कालावधीत सेन्‍सेक्‍सने 96 अंशाची साप्‍ताहिक वाढ नोंदवली.

१८९५५ च्‍या स्‍तरावर सेन्‍सेक्‍सला प्रतिकाराचा सामना करावा लागेल असे मागील विश्‍लेषणात नमूद केले होते या आठवडयात त्‍याची तंतोतंत प्रचिती आली. १९०७८ चा स्‍तर गाठल्‍याबरोबर सेन्‍सेक्‍सवर निराशेचे ढग दाटून आले. १९००० अंशाचा मैलाचा दगड पार करणा-या सेन्‍सेक्‍सने पुन्‍हा १८८५८ वर साप्‍ताहिक बंद दिला.

सेन्‍सेक्‍सला १८७२६ वर भक्‍क्‍म पाठबळ उपलब्‍ध आहे या पाठबळाच्‍या आधारे सेन्‍सेक्‍सची पुढील आगेकूच चालू राहील असे वाटते. यानंतरचा अडथळा पार करण्‍याअगोदर सेन्‍सेक्‍स, १८७०० ते १९०५० या स्‍तरावर काही काळ जमवणुकीचे सत्र चालू ठेवण्‍याची शक्‍यता वाटते. गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीयोग्‍य समभाग आत्‍ताच हेरुन ठेवलेले बरे ! महाकाय (Large Cap) कंपन्‍यांमध्‍ये गुंतवणुकीचे धोरण ठेवावे स्‍टेट बॅंक ( ` २४७८ ) आणि लार्सन अॅंण्‍ड टुब्रो ( ` १८३६ ) हे समभाग तेजीत चांगलाच फायदा करुन देतील असे वाटते.

Saturday, July 2, 2011

तेजीची आगेकूच

२७ जून २०११ रोजी सुरु झालेल्‍या सप्‍ताहात सेन्‍सेक्‍स १८१३२ वर उघडला. हीच सेन्‍सेक्‍सची आठवडयातील किमान पातळी होती तर साप्‍ताहिक कमाल पातळी १८८७३ होती. शुक्रवारी १ जुलै रोजी सेन्‍सेक्‍स १८७६२ वर बंद झाला. गेल्‍या सप्‍ताहात सेन्‍सेक्‍सने ५२२ अंशाची वाढ नोंदवली. दिवसभरात 513 अंशाची जोरदार वाढ नोंदवत सेन्‍सेक्‍स 18240 अंशावर बंद झाला. आठवडयात सेन्‍सेक्‍सने ५२२ अंशाची साप्‍ताहिक वाढ नोंदवली.

अमेरिकन अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये पुन्‍हा निराशेचे ढग जमा होवू लागले आहेत. युरोपियन बाजाराच्‍या तुलनेने आशियाई बाजाराकडून अधिक परतावा मिळविण्‍यासाठी परकिय संस्‍थागत गुंतवणुकदारांनी सध्‍या जोरदार खरेदी सुरु केली आहे. त्‍याचे प्रतिंबिंब वाढत्‍या सेन्‍सेक्‍समध्‍ये उमटते आहे. त्‍यामुळेच भारतीय शेअरबाजाराबरोबरच जपान, चीन आणि सिंगापूर शेअरबाजाराने उत्‍तम कामगिरी नोंदवली.

मागील आठवडयाच्‍या विश्‍लेषणात १७९०० वर प्रतिकाराचा सामना करावा लागेल असे नमुद केले होते पण जोरदार खरेदीच्‍या सत्रामुळे सेन्‍सेक्‍सने हा अडथळा लिलया पार करतानाच १८६०० अंशांच्‍या पलिकडे झेप घेतली आहे. यापुढे सेन्‍सेक्‍सचे लक्ष्‍य १९५८४ असेल त्‍याअगोदर सेन्‍सेक्‍सला १८९५५ आणि १९१७३ या स्‍तरावर प्रतिकराचा सामना करावा लागेल.

मागील लेखामध्‍ये सूचित केलेल्‍या समभागांपैकी अपोलो टायर्स, डीश टी‍व्‍ही, येस बॅंक आणि आरईसी यांनी लक्ष्‍य – 1 ची पूर्तता केली आहे. आता लक्ष्‍य - 2 चा विचार करावा .


- प्रविण निकम
email - askmeta@rediffmail.com