marathi blogs widget

Thursday, July 14, 2011

तेजीचा गतिरोधक

4 जुलै 2011 रोजी सुरु झालेल्‍या सव्‍ताहात सेन्‍सेक्‍स १८८९६ वर उघडला. आठवडयातील सेन्‍सेक्‍सची किमान पातळी १८८६२ होती तर साप्‍ताहिक कमाल पातळी १९०९७ होती. शुक्रवार, 8 जुलै रोजी सेन्‍सेक्‍स १८८५८ वर बंद झाला. या सप्‍ताहात सेन्‍सेक्‍सने १९००० चा टप्‍पा पार केला तरी नफा वसुलीमुळे सप्‍ताहाचा शेवट निराशेत झाला. मागील कालावधीत सेन्‍सेक्‍सने 96 अंशाची साप्‍ताहिक वाढ नोंदवली.

१८९५५ च्‍या स्‍तरावर सेन्‍सेक्‍सला प्रतिकाराचा सामना करावा लागेल असे मागील विश्‍लेषणात नमूद केले होते या आठवडयात त्‍याची तंतोतंत प्रचिती आली. १९०७८ चा स्‍तर गाठल्‍याबरोबर सेन्‍सेक्‍सवर निराशेचे ढग दाटून आले. १९००० अंशाचा मैलाचा दगड पार करणा-या सेन्‍सेक्‍सने पुन्‍हा १८८५८ वर साप्‍ताहिक बंद दिला.

सेन्‍सेक्‍सला १८७२६ वर भक्‍क्‍म पाठबळ उपलब्‍ध आहे या पाठबळाच्‍या आधारे सेन्‍सेक्‍सची पुढील आगेकूच चालू राहील असे वाटते. यानंतरचा अडथळा पार करण्‍याअगोदर सेन्‍सेक्‍स, १८७०० ते १९०५० या स्‍तरावर काही काळ जमवणुकीचे सत्र चालू ठेवण्‍याची शक्‍यता वाटते. गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीयोग्‍य समभाग आत्‍ताच हेरुन ठेवलेले बरे ! महाकाय (Large Cap) कंपन्‍यांमध्‍ये गुंतवणुकीचे धोरण ठेवावे स्‍टेट बॅंक ( ` २४७८ ) आणि लार्सन अॅंण्‍ड टुब्रो ( ` १८३६ ) हे समभाग तेजीत चांगलाच फायदा करुन देतील असे वाटते.

No comments: