आशेचा कवडसा
20 जून 2011 रोजी सेन्सेक्स 17925 वर उघडला. आठवडयातील सेन्सेक्सची किमान पातळी 17314. शुक्रवारी 24 जून रोजी सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली तेव्हा सप्ताहातील सेन्सेक्सची कमाल पातळी 18268 होती. दिवसभरात 513 अंशाची जोरदार वाढ नोंदवत सेन्सेक्स 18240 अंशावर बंद झाला. आठवडयात सेन्सेक्सने 370 अंशाची साप्ताहिक वाढ नोंदवली. गेल्या अनेक दिवसात मरगळलेला सेन्सेक्स 24 जून रोजी तजेला निर्माण करुन गेला.
मौसमी पावसाच्या दमदार आगमनामूळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये टवटवी निर्माण झाली आहे. ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला नवीन उभारी देणारी पावले युरोपियन आर्थिक समुदायाने उचलल्यामुळे परकिय गुंतवणुकीदारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या सर्वांच्या परिणामामूळे सेन्सेक्सने देखील 17500 च्या स्तरावरुन उसळी घेतली आहे.
17300 ते 17493 या स्तरावर सेन्सेक्सला भक्कम पाठबळ निर्माण झाले आहे. 24 जून रोजी सेन्सेक्सने तेजी दाखवली तरी नफा वसुलीमुळे वाढलेल्या समभागाच्या भावांमध्ये आगामी आठवडयात काही प्रमाणात पडझड होवू शकते. सेन्सेक्सचे पुढील लक्ष्य 18600 असेल. 17900 च्या स्तरावर प्रतिकाराचा सामना करावा लागेल अशी शक्यता वाटते.
गुंतवणुकदारांनी खालील समभागांचा गुंतवणुकीसाठी विचार करावाः
| कंपनी | तोटा बंदी – 1 Stop Loss -1 | लक्ष्य - 1 Target - 1 | तोटा बंदी – 2 Stop Loss -2 | लक्ष्य - 2 target - 2 |
| Apollo Tyre | 70 | 75 | 75 | 85 |
| Dish TV | 80 | 100 | | |
| Yes Bank | 300 | 310 | 315 | 340 |
| REC | 180 | 200 | 195 | 215 |
- प्रविण निकम
email - askmeta@rediffmail.com