२७ जून २०११ रोजी सुरु झालेल्या सप्ताहात सेन्सेक्स १८१३२ वर उघडला. हीच सेन्सेक्सची आठवडयातील किमान पातळी होती तर साप्ताहिक कमाल पातळी १८८७३ होती. शुक्रवारी १ जुलै रोजी सेन्सेक्स १८७६२ वर बंद झाला. गेल्या सप्ताहात सेन्सेक्सने ५२२ अंशाची वाढ नोंदवली. दिवसभरात 513 अंशाची जोरदार वाढ नोंदवत सेन्सेक्स 18240 अंशावर बंद झाला. आठवडयात सेन्सेक्सने ५२२ अंशाची साप्ताहिक वाढ नोंदवली.
अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा निराशेचे ढग जमा होवू लागले आहेत. युरोपियन बाजाराच्या तुलनेने आशियाई बाजाराकडून अधिक परतावा मिळविण्यासाठी परकिय संस्थागत गुंतवणुकदारांनी सध्या जोरदार खरेदी सुरु केली आहे. त्याचे प्रतिंबिंब वाढत्या सेन्सेक्समध्ये उमटते आहे. त्यामुळेच भारतीय शेअरबाजाराबरोबरच जपान, चीन आणि सिंगापूर शेअरबाजाराने उत्तम कामगिरी नोंदवली.
मागील आठवडयाच्या विश्लेषणात १७९०० वर प्रतिकाराचा सामना करावा लागेल असे नमुद केले होते पण जोरदार खरेदीच्या सत्रामुळे सेन्सेक्सने हा अडथळा लिलया पार करतानाच १८६०० अंशांच्या पलिकडे झेप घेतली आहे. यापुढे सेन्सेक्सचे लक्ष्य १९५८४ असेल त्याअगोदर सेन्सेक्सला १८९५५ आणि १९१७३ या स्तरावर प्रतिकराचा सामना करावा लागेल.
मागील लेखामध्ये सूचित केलेल्या समभागांपैकी अपोलो टायर्स, डीश टीव्ही, येस बॅंक आणि आरईसी यांनी लक्ष्य – 1 ची पूर्तता केली आहे. आता लक्ष्य - 2 चा विचार करावा .
- प्रविण निकम
email - askmeta@rediffmail.com
Saturday, July 2, 2011
तेजीची आगेकूच
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment